जळगाव मिरर | २४ जुलै २०२५
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू सुरू असून यावर प्रशासनाकडून नेहमीच कारवाईचा बळगा उचलला जात असतो तरीदेखील अवैध वाळू चोरी रोखता येत नसते. मात्र आता एका तहसीलदारांचा गिरणा नदी पात्रात पोहत वाळू चोरांवर कारवाईच्या प्रयत्नात असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने वाळू चोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे दिनांक 24 रोजी जळगाव येथून धरणगाव जात असताना महामार्गनजीक असलेल्या बांभोरी पुलावरून गिरणा नदी पात्रात पुलावरून पाहिले असता अनेक ट्रॅक्टर नदीपात्रात वाळूचे उत्खनन व वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसताच त्यांनी लागलीच गिरणा नदी पात्रात उतरत सिनेस्टाईल पद्धतीने गिरणा नदी पात्रात पोहत पोहत जाऊन वाळू चोरांवर लगाम लावण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र वाळूचोरांना तहसीलदार असल्याचे लक्षात येताच त्यांनी नदीपत्रातून पसार झाले असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे.
तहसीलदारांचे नागरिकांकडून कौतुक
भर दिवसा गिरणा नदी पात्रात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आपला जीव धोक्यात टाकून गिरणा नदी पात्रात पोहत पोहत वाळू चोरांपर्यंत पोहोच पोहोचले मात्र वाळू चोरांना तहसीलदार असल्याचे लक्षात येतात वाळू चोरांनी या ठिकाणाहून पळ काढला त्यामुळे ही कारवाई थोडक्यात अयशस्वी झाली असली तरी तहसीलदारांच्या धडाकेबाज प्रयत्न केल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.




















