जळगाव मिरर / ६ फेब्रुवारी २०२३ ।
शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलाची लांबी कमी करून राधाकृष्ण चौकात उतरविणे किवा राधाकृष्ण चौकात अंडरपास देण्यासह कानळदा रस्त्यावर टी पॉईंट पर्यत दोन्ही बाजूचे आर.सी.सी.गटार व सिमेंट रस्ता बनवून देण्यासाठी आज सकाळी ११ वा.नगरसेवक दिलीप पोकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालायाबाहेर एक दिवशीय धरणे आंदोलन केले.
निवेदनात म्हटले आहे कि, पिंप्राळा उड्डाणपुल रेल्वे फाटक क्रमांक १४७ हा महत्वकांक्षी प्रकल्प आमचे प्रभागात सुरू आहे. आमचे माहिती प्रमाणे सदर उड्डाणपुलाचे डिझाईन वेळोवेळी बदलण्यात आले.सदरचा बदल हा फक्त रेल्वे प्रशासन व महारेल यांचेच हित लक्षात घेवुन करण्यात आले. त्यालाचा अनुसरून महारेल ने मनमानी पध्दतीने तयार केलेला डिझाईन प्रमाणे उड्डाणपुल तयार झाल्यास स्थानिक नागरीकांच्या अत्यंत गैरसोईचे होणार आहे. रोज असंख्य अपघात होतील. बहुसंख्य वाहने हे विरूध्द दिशेने वाहतुक करतील.
सदरची डिझाईन करतांना प्रभागातील साधारण २० ते २५ कॉलन्यांचा अजिबात विचार केलेला दिसुन येत नाही. तसेच महारेल चे संबंधीत अधिकारी व महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक यांचेशी झालेल्या वेळोवेळी चर्चा प्रमाणे महारेल ने आश्वासन दिले होते की, आम्ही बुध्द विहार ते कानळदा रस्ता टी पॉईट पर्यंत दोन्ही बाजुच्या आर.सी.सी. गटार व रस्ता कॉक्रीट करून देवु. तसे पत्र महानगरपालिका आयुक्त यांनी महाल यांना पुर्वीच दिले आहे. त्याची प्रत सोबत जोडलेली आहे. सदर महारेल ने संपूर्ण रस्ता हा त्यांचे मटेरियल ठेवणेकरीता तसेच पिलर तयार करण्याकरीता वर्कशॉप म्हणुन वापरलेला आहे. करीता सदरचा रिंग रोड अत्यंत खराब झालेला आहे. तसेच महारेल ने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवुन स्थानिक नगरसेवक यांनी सदरचा रस्ता हा कुठल्याही निधीत प्रस्तावित केलेला नाही. सदरचे बाब लक्षात घेता आपणास या निवेदना व्दारे नम्र विनंती आहे की, संबंधीत सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवुन आमची खालील प्रमाणे असलेली मागणी त्वरीत मान्य करण्यात यावी व स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यात यावा. पिंप्राळा उड्डाणपुलाची लांबी कमी करून राधाकृष्ण चौकात उतरविणे किंवा राधाकृष्ण चौकात अंडरपास देणे कानळदा रस्ता टी पॉईट पर्यत दोन्ही बाजुचे आर.सी.सी. गटार व सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनवुन देणे, निवेदनावर नगरसेवक दिलीप पोकळे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.