जळगाव मिरर | २६ जून २०२३
महिलेला दुचाकीवरून सोडण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेत अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला असून रविवार २५ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास याच गावातील संशयित लखन पवार याने पिडीत महिलेला ओळखीचा फायदा घेत दुचाकीवर बसवून जंगलात नेत त्याने पीडीतेचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरीने अत्याचार केला. भेदरलेल्या पीडीतेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत लखन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.