जळगाव मिरर | २५ जून २०२३
राज्यातील अनेक तरुण शिक्षण असतांना ही बेरोजगार आहे. पण अशा बेरोजगार तरुणांना आता सरकारने गोड बातमी दिली आहे. राज्यात नुकतीच जाहीर झालेली ४ हजाराच्या तलाठ्याची पदे भरण्यासाठी आता अर्ज २६ उद्यापासून करता येणार आहे. २६ जून ते १६ जुलैदरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदत असून या प्रक्रियेद्वारे जळगाव जिल्ह्यात २०८ पदे भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य शासनाने पदांच्या संख्येबाबत अनिश्चितता दाखविली आहे. आरक्षणानुसार ही पदे कमी किंवा जास्त होऊ शकतात, असेही स्पष्ट केले आहे. जिल्ह्यासाठी २०८ पदांची भरती होणार आहे. त्यात ६९ पदे सर्वसाधारण तर ६२ महिलांसाठी आरक्षित आहेत. खेळाडूंसाठी १० माजी सैनिकांसाठी ३२ प्रकल्पग्रस्तांसाठी १० व भूकंपग्रस्तांसाठी ४ जागा आरक्षित असतील. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी २१ तर अनाथांसाठी २ जागा आहेत. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी मात्र ५५ वर्ष वयाची कमाल मर्यादा आहे. त्यामुळे अनेकांना तलाठी संवर्गात काम करण्याची संधी मिळणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमानुसार दि.२६ ते १७ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. याच मुदतीत फी भरावी लागेल. त्यानंतर लेखी परीक्षेचा कार्यक्रम शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बौद्धिक चाचणीसाठी प्रत्येकी २५ प्रश्न असतील. त्यासाठी प्रत्येकी ५० गुण असतील. १०० प्रश्नांचा समावेश असणारी २०० गुणांची ही परीक्षा होणार असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.