जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असताना नुकतेच जळगाव – भुसावळ महामार्गावर बस व दुचाकीच्या झालेल्या अपघतात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या अपघातात एक महिला देखील गंभीर जखमी असल्याचे समजते.
एक भीषण अपघात झाला आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या महिला गंभीरजखमी झाल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरीळ साकेगावनजीक असलेल्या वाघुर नदीच्या पुलावर दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी आहे. यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जखमी झालेल्या महिलेला हलविण्यात आले असून भुसावळ तालुका पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. अद्याप मयत दुचाकीस्वाराने नाव समजू शकलेले नाही.