जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३
राज्यात अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना शुक्रवारी एका ट्रालाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी आहे. हा अपघात सूरत-नागपूर महामार्गावर घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील सूरत-नागपूर महामार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळून शुक्रवारी सायंकाळी गावातील रहिवासी देवा भील ( वय. ४२), पुनम मालचे ( वय. १५) व भटाबाई सूर्यवंशी (वय. ६६) हे दुचाकीने एमएच ४१ एएन ५५७९ घराकडे जात होते. त्या वेळी साक्रीहून भरधाव वेगाने ट्राला एनएल ०१ एजे ७७७० धुळ्याकडे जात होता. देवा भील रस्ता ओलांडत असताना ट्रालाने त्यांना धडक दिली. त्यामुळे देवा भील व पूनमचा जागीचा मृत्यू झाला. तसेच भटाबाई सूर्यवंशी गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. मृतांच्या नातलगांना भरपाई द्यावी, महामार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी झाली. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मग आंदोलन मागे घेण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर दोन तास ठिय्या आंदोलन झाल्याने वाहतूक ठप्प णली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागली होती. महामार्ग पोलिसांनी अपघात स्थळांची पाहणी केली होती.