जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुक तोंडावर असतांना राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना नुकतेच राज्याचे वन मंत्री सुधीर मुगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
वन मंत्री सुधीर मुगंटीवार म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांना तीन दिवस दिल्लीत राहून काँग्रेस नेत्यांची वाट बघत मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते यासारखे दुर्देव नाही. तेच मुख्यमंत्री असणार हे इतर दोन मित्रपक्ष सांगायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आता सहानुभूती वाटत आहे. आमच्या सोबत असताना खिशात राजीनामा घेऊन धमकी देत होते. मात्र, ही धमकी आता दिली तर आघाडीतील नेते त्यांच्या खिशातले राजीनामे केव्हाही बाहेर काढतील हे सांगता येत नाही. आज त्यांच्यावर दिल्ली दरबारी वणवण भटकरण्याची वेळ आली आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.