जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
राज्यातील बदलापूर शहरात धक्कादायक घटना असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गुन्हा दाखल करून घेण्याबाबतच पोलिसांनी 12 तास का लावले? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. पोलिसांकडून झालेला हा कुठला हलकर्जीपणा? असल्याचे म्हणत त्यांनी राज्याच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेकडे लक्ष वेधले आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. मात्र महाराष्ट्र सैनिकांना माझे सांगणे आहे की, या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचे लक्ष असू द्या, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून हलगर्जीपणा होतो, असा आरोप देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.
या संदर्भात राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ….’