जळगाव मिरर / ३ फेब्रुवारी २०२३
शहरातील एमआयडीसी परिसरातून मलकापूर एमआयडीसी पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्हात एकास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी पोलिस स्थानकात दाखल असलेला संशयित आरोपी गणेश ज्ञानदेव नेहते (वय 33, रा.खुपचंद नगर,सुप्रिम कॉलनी, जळगाव) हा गेल्या पाच महिन्यापासून फरार होता आज दि.3 रोजी जळगाव एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंदसिंग पाटील, पोना.किशोर पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील, पो.कॉ.किरण पाटील यांनी संशयित आरोपी गणेश नेहतेला ताब्यात घेवून मलकापूर एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस प्रल्हाद चोपडे यांच्या ताब्यात दिले आहे.