जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२३
जगभरात आपल्या वक्तव्याने व चमत्काराने चर्चेत येणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा नुकतेच छत्रपती संभाजी नगर येथे आले असतांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले आहे. त्यांनी थेट मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे.पत्रकारांशी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, मनातलं ओळखणं वेगळं असतं आणि अधिकारांवर बोलणं वेगळं असतं. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा मराठ्यांना शौर्य दाखवून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे बागेश्वर पीठ मराठा समाजाबांधवांच्या सोबत आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे.