
जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४
राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोर्चे व निवेदने सुरु असून नुकतेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्री यांनी यात हजगर्जीपणा करू नये. तुमच्या सत्तेत ते लोकं आहेत, तुम्ही कुणाचा मुलायजा ठेवू नये, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर फडणवीसांनी मुंडेंना धोस दिली तर आरोपी सकाळपर्यंत हजर होईल. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठिशी घालू नये.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जातीयवाद पसरेल असे काही करु नये. जातीयवाद नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. लोकं गुंडगिरी करत जमीनी हडपत पोलिसांना अरेरावी करत शिव्या देऊ लागले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. तुम्ही यांना संभाळू नका, नाही तर तुमच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ येईल.
मनोज जरांगे म्हणाले की, हे लोकं असे आहेत की तुम्ही यांना वाचवायला जाताल आणि हे तगडीवर करुण तुमच्यावर XX, मुख्यमंत्रीसाहेब मग तुम्हाला वाटेल की तेव्हाच यांना संपविले असते तर परवडले असते. लक्षात ठेवा तुम्ही यांना पाठिशी घालू नका.
मनोज जरांगे म्हणाले की, 24 तासात कुणालाही अटक होऊ शकते. आरोपींना 19 दिवसानंतर अटक होत नाही म्हणजे मुख्यमंत्री यांना पाठिशी घालत आहेत. ते आरोपींना सांभाळत आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या वक्तीचा खून झाला असता तर त्यांना झोप आली असती का?असा सवालही त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जर फोन करुन सांगितले की, कोण आहे त्याला फोन करुन सांग लवकर अटक हो, लपून बसून नको, अशी धोस जर दिली तर उद्या सकाळी त्या आरोपी हजर होईल. याचा अर्थ सर्वांनी मिळून त्याला लपवून ठेवले आहे अशी शंका निर्माण होत आहे. असे असेल तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची आम्ही जिरवणार आहोत. आणि यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार.