
जळगाव मिरर | १ एप्रिल २०२५
शहरातील प्रभाग क्र.१ मधील सुरेश कलेक्शन ते मारोती चौक या मुख्य ८० फुटी रस्त्यावर गेल्या महिन्यात सिमेंटचे रस्ते बनविले होते. या ठेकेदाराने बनविलेले रस्ते चक्क एक महिन्यात खराब झालेले दिसून आले आहे. याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी कुठलीही कारवाई करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जनतेच्या पैश्यावर ठेकेदार अशा प्रकारे डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या तरी प्रभाग क्र.१ मध्ये दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्र.१ दुध फेडरेशन परिसरातील नवीन उड्डाणपुलाजवळील सुरेश कलेक्शन ते मारोती चौकच्या ८० फुटी रस्ता ठेकेदाराने फेब्रुवारी – मार्च महिन्यात सिमेंटचा बनविला होता. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस हा रस्ता सिमेंट बाहेर येवून रस्त्ता खराब झाला आहे. यावर काही नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी नागरिकांनी उडवाउडवीची उत्तर देवून ठेकेदाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून परिसरात निकृष्ट दर्जाची कामे होण्यास मूक समती देत आहेत. का असा देखील प्रश्न निर्माण हो आहे. या ठेकेदारावर कोणती व कधी कारवाई मनपा अधिकारी करणार यावर आता लक्ष लागून आहे.