
जळगाव मिरर | १८ मे २०२५
चोपडा शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एका घराची पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मुसा खान उस्मान कुरेशी (६३), असे मृत इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील शेतपुरा भागात एका घराची भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात चार जण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेले मुसा खान कुरेशी यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नजमाबी मुसा खान कुरेशी (५९), दिलकीशबी शिराज खान शेख रियाज (३५) आणि शिरीन बी इम्रान खान कुरेशी (३०) हे जखमी झाले आहेत.