जळगाव मिरर | २४ मे २०२३
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमधील पथक दि. २२ रोजी बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात संशयित आरोपींची तपासणी करत असताना एक युवक अल्पवयीन मुलीसोबत आढळून आला. तो तडीपार असलेला गुन्हेगार असून त्याने मुलीला पळवल्याचे समोर आले. अमोल ऊर्फ भावड्या दिलीप वाघ (वय २४ रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दर्गा परिसरात संशयितांची तपासणी करीत असताना एक युवक एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. युवकावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रकार उघडकीस आला. येवला तालुका पोलिस स्टेशन जि. नाशिक येथे संपर्क साधला. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याचे समोर आले. तसेच इतर तीन गुन्ह्यांतही तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. ऑगस्ट २०२२ पासून नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातून त्याला हद्दपार केले होते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहा. पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सपोनि विशाल टकले, सागर ढिकले, पोहेकॉ. योगश बेलदार, नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, पोना. भूषण पाटील, पंढरीनाथ पवार, पोना. विनोद भोई, पोकॉ. रवींद्र बच्छे, पोकॉ. नीलेश पाटील, यांनी ही कामगिरी टकले, केली.