जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
अनेक वेळा अगदी तंदुरुस्त दिसणारे लोकही आतून कोणत्या ना कोणत्या आजाराशी झुंजत असतात. अलीकडेच, जगातील सर्वात शक्तिशाली आणि मजबूत बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचिक यांचे निधन झाले. बॉडीबिल्डरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येफिमचिक कोमात गेला होता, त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
जगातील सर्वात शक्तिशाली बॉडीबिल्डर येफिमचिक फक्त ३६ वर्षांचे होते. या बेलारशियन बॉडीबिल्डरचे शरीर अतिशय आकर्षक आणि तंदुरूस्त होते. त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या पत्नीने इलिया गोलेम येफिमचिक यांच्या छातीवर दाब दिला. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याने हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांच्या मेंदूनेही काम करणे बंद केले होते. येफिमचिक दिसायला इतका मोठा होता की, त्याचे वजन 340 पौंड होते आणि ते 6 फूट उंची होती. त्याचवेळी, त्याच्या छातीचा आकार 61 इंच होता आणि त्याचे बायसेप्स 25 इंच होते. जे सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होते.