जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३
यावल येथील एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्रांला बोलून दाखवत आवेश दगडू तडवी (वय-३०) याने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहित अशी की, बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता यावल सातोद रस्त्यावरील सुनिल भाऊसाहब भोईटे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघकीस आली आहे. ३० वर्षीय तरुण आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह वास्तव्याला होता. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने त्याचा मित्राला फोन करून मला माझ्या लहान मुलाला भेटण्याची इच्छा आहे असे सांगितले होते. विहिरीजवळ मयताचे दुचाकी आणि चप्पल आढळून आले. त्यानुसार विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आवेश याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ होवु शकले नाही. घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यांसह धाव घेत मयताचे प्रेत विहीरीतुन बाहेर काढण्यासाठी तडवी कुटुंबास मदत केली.