जळगाव मिरर | ७ जुलै २०२३
पारोळा तालुक्यातील एका २६ वर्षीय तरुणी मतीमंद असल्याचा फायदा घेत नराधम तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला व त्यातून पीडीता चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जीवन बापू पाटील (पारोळा तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका २६ वर्षीय पीडीता मतीमंद असून तिच्या असायतेचा फायदा संशयित आरोपी जीवन पाटील याने घेतला. गेल्या चार महिन्यांपासून ते 20 जूनपर्यंत पीडीतेसोबत अत्याचार करण्यात आल्याने पीडीता 17 आठवड्यांची गर्भवती राहिल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी पीडीतेच्या बहिणीने पारोळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर जीवन पाटीलविरुद्ध अत्याचार व अॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर करीत आहेत.