जळगाव मिरर । १५ जानेवारी २०२३ ।
गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलांचे गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये संशयित आरोपीहि अल्पवयीन व फिर्यादी सुद्धा अल्पवयीन असल्याच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या एक वर्षापासून सतत १२ वर्षीय मुलीवर अत्यचार करीत तिला गरोदर ठेवल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात त्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात एक १२ वर्षे मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे तिच्यावर मागील एक वर्षापासून एका सोळा वर्षे युवकांनी संशयित आरोपीच्या घरी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत गरोदर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी १२ वर्षीय मुलीच्या वडिलांनी यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून १६ वर्षीय युवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.