जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।
गुरु व शिष्याचे नाते खूप पवित्र मानले जात असते. पण याच नात्याला काळिमा लागला असल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. शहरातील दोन ठिकाणी अवघ्या १९ वर्षीय तरुणीला चुकीचे इशारे करीत तिचा शिकविणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ शहरातील एका १९ वर्षीय तरुणी एका मोठ्या करिअर क्लासमध्ये शिक्षण घेण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे. त्याच क्लासेसमधील एका शिक्षकाने त्या तरुणीसोबत दि १ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी क्लासमध्ये शिकवीत असतांना तरुणीला न विचारता त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली त्यासोबतच एका मैदानावर रनिग करीत असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तसेच सुरु असलेल्या क्लासमध्ये देखील तरुणीसोबत चुकीच्या पद्धतीने इशारे करीत असल्याने शिक्षकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.मोहम्मद सैय्यद हे करीत आहेत.
