जळगाव मिरर | १२ मे २०२३
भुसावळ येथील छबीलदास मार्केटसमोरील गणेश ट्रेडिंग दुकानाचे संचालक मोहन चावराई यांना आधी बंदूक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेली आहे. मात्र चावराई यांनी साखळी पकडून ठेवल्याने चोरट्यांना फक्त अर्धीच साखळी मिळाली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघम घटनास्थळी दाखल झाले होते, तर माजी नगरसेवक निक्की बत्रा अजय नगराणी हेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चावराई हे दुकान बंद करत असताना दोन चोरट्यांनी येऊन चाकू व बंदूक दाखवून पैशांची बॅग मागितली. बॅग नसल्याने गळ्यातील सोन्याची साखळी तोडून चोरटे पळून गेले. चावराई यांनी विरोध केल्याने चोरट्यांना अर्धीच साखळी मिळाली. पोलिसांनी घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.