जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४
देशात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच बिहार राज्यातील हटके लव्ह स्टोरी समोर आली आहे. बिहार राज्यातील पाटणा शहरात एका मामीने आपल्या भाचीवरील प्रेमापोटी चक्क पतीला सोडचिठ्ठी दिली आहे. एवढेच नव्हे तर यानंतर तिने पळून जाऊन भाचीशी लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. दोघींनी सोशल मीडियाद्वारे आपापल्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिली.
तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. बेलवा येथील रहिवासी असलेल्या मामी आणि भाचीने आपल्या सर्व नातेवाईकांचा विचार न करता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले. दोघींनी एकमेकींना हार घातले आणि सप्तपदी घेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिले. भाची शोभाच्या प्रेमात वेडी झालेली सुमन मामी म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे. मला भीती वाटत होती की तिचे दुसरीकडे लग्न झाले तर ती मला सोडून जाईल. या भीतीपोटी आम्ही दोघींनी सर्व काही सोडून मंदिरात लग्न केले. सध्या या दोघींचे लग्न हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.