जळगाव मिरर | ११ मे २०२३
देशात अनेक राज्यात ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. तर जळगाव जिल्ह्यात देखील या चित्रपटाचे जोर वाढत असून हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक गर्दी करत आहे. तर अनेक सामाजिक संस्था चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे स्वागत करून आभार देखील मानत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळाले आहे.
जळगाव शहरातील श्री.छत्रपती बजरंग मित्र मंडळातर्फे दि १० रोजी ज्या ज्या चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत जात प्रेक्षकांचा सत्कार करीत आभार मानले आहे. यावेळी दीपक सोनवणे, जिगर जोशी, आतिश बारसे, पप्पू साळी, भैया पाटील, शिवा लैंडवे, निलेश कोळी, जयेश वाघ,सुरेश सोनवणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.