जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३
राज्यातील हवामान सातत्याने बदल होत असताना हवामान खात्याने गेल्या दोन दिवसाआधीच जळगाव जिल्ह्यात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज जळगाव जिल्ह्यातील काही भागात जाणवू लागला आहे. आज दि ७ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काही भागात सायंकाळी ४ वाजेपासून मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.या बरोबरच जळगाव शहरातही ७ वाजेपासून काही भागात ढगाळ वातावरण दिसू लागले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील परिसरात दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह काही प्रमाणात वारा व पावसाला सुरवात झाली. साधारणतः फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळा सुरू होत असतो, तर मार्च, एप्रिल व मे असे चार महिने हे कडक-मध्यम उन्हाळ्याचे असतात असे असताना सुद्धा असा अनुभव खूप कमी येताना दिसत आहे. अवकाळी पाऊस, मेघ गर्जना वारा हे यंदा अवेळी होताना दिसत आहे याचेच उदाहरण म्हणजे परिसरात अचानक दुपारी ४ च्या सुमारास मेघ गर्जना होऊन काही प्रमाणात वारा तसेच पावसाला सुरावात झाली. ७ एप्रिल रोजी सकाळचे वातावरण थंड दमट होते, तसेच दुपारी अकरा व बारा वाजताच्या सुमारास कडक उन्हाळा जाणवू लागला व त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अचानक वारा, मेघ गर्जनेसह कुठे तुरळक तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस हा पडला. उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. यावर्षी निसर्गचक्राचे जणू गणित चुकले की काय अशी लोकांमधे चर्चा आहे.
