
जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
अनेक अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच सातारा शहर पोलिसात एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या काकावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयाने ५ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. याघटनेने नात्याला काळिमा फासला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास असून २४ वर्षाच्या चुलत काका विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आरोपी काका हा त्याने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. तसेच शेतातही नेऊन अत्याचार केला. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. ‘हा प्रकार तू कोणाला सांगितलास तर तुला मारून टाकीन, तुमचे घर जाळून टाकेन,’ अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे युवतीने हा प्रकार काही दिवस घरात कोणाला सांगितला नव्हता. मात्र, गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला.