• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
Share on FacebookShare on Twitter
श्री मंगळग्रह मंदिरातून वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले सपत्नीक पूजन
जळगाव मिरर | २५ जुलै २०२६ 
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‌‘ज्ञानोबा-तुकाराम‌’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. वारकरी संप्रदायातील भक्तिपरंपरेचा आणि संतांच्या समतेच्या संदेशाचा प्रत्यय देणाऱ्या या सोहळ्याने भाविकांच्या मनात अध्यात्माची नवऊर्जा संचारली.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाला स्पर्श करीत मंत्रोच्चारात दिंडीचे पूजन केले व भगव्या पताकेला वंदन करून दिंडीला खांदा दिला. त्यानंतर त्यांनी हातात टाळ घेऊन काही वेळ दिंडीत सहभाग नोफ्लदवत आनंदही घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली. यावेळी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार प्रशांत धमके, तसेच महसूल प्रशासनाचे पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‌‘सीईओ‌’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी घुगे यांनी श्री मंगळग्रह मंदिरात सपत्नीक पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. महाले यांनी त्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान केला.
तत्पूर्वी, श्री मंगळग्रह मंदिरात पहाटेच श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती झाली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‌‘राम कृष्ण हरी‌’, ‌‘ज्ञानोबा-तुकाराम‌’ आणि ‌‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल‌’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाने जपलेली समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठा यांचा संदेश दिंडीतून समाजापर्यंत पोहोचला. विठ्ठलभक्ती ही केवळ उपासना नसून ती माणसाला माणुसकी, सेवाभाव आणि सदाचाराकडे नेणारी जीवनपद्धती आहे, याची प्रचिती या सोहळ्यातून सर्वांना आली.
दिंडी मार्गातील पैलाड परिसर, चोपडा नाका या ठिकाणी भाविकांनी दिंडीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार, वाडी संस्थानापर्यंत दिंडीतील सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हटला तसेच फुगडी खेळली. भक्तिभावाने नटलेली ही दिंडी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यावर तेथे संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव व सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दिंडी पुनश्च श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
आषाढी एकादशीच्या या पावन सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचा अद्वितीय संगम घडवून आणला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हती, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणातील विठ्ठलभक्तीला जागविणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळविणारी एक मंगल यात्रा ठरली.
श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमळनेरसह परिसरातील भाविकांनी श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनासाठी रिमझिम पाऊस सुरू असताना शनिवारी, दि. २५ जुलै रोजी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी भाविकांनी दिंडीतही काही वेळ सहभाग नोफ्लदवत भक्तीचा संगम घडविल्याचे चित्र आज या परिसरात दिसून आले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वात मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरातील या भाविकांच्या मांदियाळीमुळे श्री मंगळग्रह मंदिरात अध्यात्माचा मंगल सुगंध दरवळल्याची अनेकांना अनुभूती आली.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group