• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सामाजिक समरसतेचा महायज्ञ

आयटीआयमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सामाजिक समरसतेचा महायज्ञ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जून २०२५

यावल – आपल्याला सामाजिक समतेचे, बंधुत्वाचे आणि समजूतदारपणाचे मूल्ये टिकवायचे असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शच आपला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे शिवराज्याभिषेक हे केवळ एका राजाचे राज्यारोहण नव्हते, तर समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधणारा सामाजिक समरसतेचा महायज्ञ होता, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

न्हावी- फैजपूर येथील जे. टी. महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्य कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार 6 जून शुक्रवार रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जगदीश पाटील यांनी सामाजिक समरसता या विषयावर संवाद साधला. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवराज्याभिषेकदिनी आयटीआय मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे अप्पर सचिव मनीषा वर्मा यांनी ऑनलाईन दिलेले व्हिडीओ दाखवण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. के. फालक, जळगाव दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, प्रेमचंद फेगडे भुसावळ, पी. के. चौधरी, के. एन. भिरूड, एस. डी. झोपे, टी. बी. बोरोले, एम. डी. महाजन, पी. व्ही. झोपे, महेश चौधरी, राजू चौधरी, हेमंत ओगले व आयटीआयमधील विविध ट्रेडचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. एस. भिरूड यांनी तर आभार प्राचार्य पी. के. फालक यांनी मानले.

सामाजिक समरसता या विषयावर संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदृष्टीचे, न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक राजे आहेत, ज्यांनी हिंदवी स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर समानतेच्या मूल्यांवर उभारले. त्यांनी प्रतिभा, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्वाच्या आधारावरच अधिकार दिला. जातपात, धर्म, वर्ग या पलीकडे जाऊन मानवतेला महत्व देणे हेच खरे स्वराज्य!, हे तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या राज्यकारभारात सामाजिक समरसता ही नैतिक मूल्ये आणि न्यायाची शिस्त होती. आजच्या काळातही त्यांचे हे धोरण आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरते, असेही ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणे. एकजुटीने आणि समतेच्या भावनेने जगणे, हीच सामाजिक समरसतेची खरी ओळख आहे. आज सामाजिक समरसता घडवण्यासाठी आपल्याला शब्दांपेक्षा कृतीवर भर द्यावा लागेल. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपणही एक समरस समाज घडवू शकतो, असा विश्वास देखील डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केला.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group