जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३
खान्देशातील एका छोट्याशा गावातून एक तरूण नोकरीसाठी मुंबईत काही वर्षापूर्वी स्थायिक होतो. सरकारी नोकरीला रामराम करीत व्यवसाय सुरु करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतांना अमराठी व्यावसायिकांच्याविरोधात संघर्ष करीत एक यशस्वी उद्योजक कसा होतो. या कथेवर खान्देशातील एका गावातील रहिवाशी असलेले प्रकाश बाविस्कर यांनी एक चित्रपट तयार केला आहे. त्याचे नाव देखील मराठी माणसाच्या रक्त गरम करेल असेच काहीसे आहे. ते म्हणजे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात प्रसिध्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव चिराग पाटील हे अभिनेत्याच्या मुख्य भूमिकेत तर अभिनेत्री म्हणून सिध्दी पाटणे ही आहे.
मराठी मालिका विश्वातून पेट 83 (एटी थी) या बॉलीवूडपटात झालेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरजीव अभिनेता चिराग पाटील आणि गोव्याच्या किनान्यावर रुपेरी वाळू सोनेरी लाटावर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला मराठी पाऊल पडते पुढे हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रार प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमिताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि या सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौदर्यवती सिद्धी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीयल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.
नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री अँड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते दि. १३ एप्रिल २०१३ रोजी दादर येथे करण्यात आला मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचेल, निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्हयातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” असे गौरवोदगार विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले. मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकन्या देणारा होऊ शकतो असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ हा निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही श्री. सुरेश हावरे यांनी ह्या प्रसंगी दिली.
मराठी पाऊल पडते पुढे हे शीर्षक वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते. असामान्य कर्तृत्व माजवलेल्या अनेक मराठी दिग्गजांनी जगाच्या नकाशावर आपली पताका डौलाने फडकवली. पण, तरीही एकुण मराठी साषिकामध्ये व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसते असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणे असू शकतात. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे. आणि ती करण्यासाठी आजचा मराठी तरुण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणान्यांची गरज आहे. ही गरज, प्रेरणा आणि ऊर्जा प्रभावी मनोरजनादवारे देण्यासाठी तसेच समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट ५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मराठी तरुणांना व्यसायाकडे वाटचाल करण्याकरीता प्रोत्साहन देणारा आणि संघर्षातून यश कसे प्राप्त करता येते याचे मार्गदर्शन करणारा हा चित्रपट आहे.
निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यानी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून रास होतो, है प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करून येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या निव्वळ नफ्यातील दहा टक्के रक्कम कलाकारांना आणि उर्वरीत भाग हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आणि वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला पाहावाच लागेल. त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५ ४४ ११ ३३ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन निर्माता श्री. प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे. अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भविष्याप्रती जागरुक करणारा ठरेल असे निर्माते प्रकाश बाविस्कर म्हणाले.