जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३ ।
चोपडा तालुक्यातील एका गावातील एका शिक्षकाने आपल्याच वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षकाने आपल्या कार्याला काळिमा फासला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील शाळेत अल्पवयीन मुलगी ८ वी मध्ये शिक्षण घेत असून या शाळेतील शिक्षक म्हणून कार्यरत असलेला संशयित आरोपी सुनील संतोष भागवत याने अल्पवयीन मुलीसोबत वैयक्तिक संबध प्रस्थापित करण्याच्या चुकीच्या उद्देशाने मुलीच्या आईचा नंबरवर दि १५ जानेवारीपासून ते आजपर्यत वेळोवेळी संपर्क करीत अश्लील भाष्य केले तर दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलीगी शाळेत एकटी असतांना तिच्या मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुनील भागवत याच्या विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी घनश्याम तांबे हे करीत आहेत.