जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२४
पद्मालयाकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाने रस्ता र ओलांडणाऱ्या महिलेला उडवीले. व मात्र तो कार चालक त्याठिकाणी न थांबता तेथून तेथून निघून गेला. रस्त्याने जातांना त्याने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. परंतु तेथून पळून जाण्यासाठी युटर्न मारत असतांना न त्याची कार रस्त्याच्या कडेला ना उलटून कारमधील दोघे गंभीर को जखमी झाले. हा अंगावर शहारे आणणारा हिट अॅण्ड रनचा थरार वावडदा आणि विटनेरच्या ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास अनुभवला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पद्मालयाकडून जळगावकडे येत असलेल्या (एमएच १५, सीडी, ८१९४) क्रमांकाच्या कारने म्हसावदजवळ एका वाहनाला कट मारला आणि तो भरधाव वेगाने निघून गेला. दरम्यान, वावडदा गावाजवळ घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या सोनबाई भिका राजपूत (रा. वावडदा) या महिलेला त्या कारने जोरदार धडक दिली. यावेळी ती महिला चेंडू सारखी उधळून रस्त्यावर आदळली गेल्याने गंभीर जखमी झाली. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र कारचालक भरधाव वेगाने विटनेरच्या दिशेने निघाला. वावडदा येथील तरुणांनी विटनेरच्या ग्रामस्थांसोबत संपर्क साधून कार चालकाला अडविण्यास सांगितले.
विटनेर येथील ग्रामस्थांनी रस्त्यात बैलगाडी आडवी लावून कार चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक तेथून युटर्न मारुन माघारी फिरला. यावेळी त्याने पप्पू कदम राठोड (रा. रामदेववाडी) या दुचाकस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार ही रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, वावडदा येथील ग्रामस्थांनी कारमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तर कारच्या धडकेत जखमी झालेल्या सोनबाई राजपूत व पप्पू राठोड यांना खासगी रुग्णालयता दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी ग्रामस्थांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.