जळगाव मिरर / २९ जानेवारी २०२३
आपण नेहमी बघत असतो, की पती पत्नीचे थोड्याना थोड्या कारणावरुन भांडण होत असते व ते काही मिनीटांपुरते असते. त्यानंतर पुन्हा जैसे थी परिस्थिती सुरु होत असती. पण काही लोकांची भांडणे इतकी टोकाला जातात की, त्याच्यातून धक्कादायक घटनाही घडत असते. झाले असे की, एका गावातील तरूणाच्या पत्नीने चक्क तरूण पतीच्या जीभेला चावा घेत त्याच्या जीभेला 15 टाके घातल्याची बातमी उघड झाली आहे. हरियाणा राज्यातील हिसार येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे.हे वृत्त एका मोठ्या वृत्तपत्राने दिले आहे.
काय घडली घटना
हिसारमधील बरवाला परिसरातील धानी ारण गावात राहणाऱ्या कर्मचंद या तरूणाचा विवाह 10 वर्षापूर्वी फतेहबाद जिल्ह्यातील इंदाछुई गावात राहणाऱ्या सरस्वतीसोबत झाला होता. गेल्या काही दिवसापासून सरस्वतीचे घरात क्षुल्लक कारणाने भांडणे होत असल्याने ती सर्वांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत असे. शुक्रवार दि.27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास काही लोकांना घरातून जोरजोरात रडण्याचा आवाज येवू लागला त्यांनी घरात जावून पाहिले असता. तरूण जमीनीवर पडलेला दिसून आला व त्याच्या तोंडातून व डोक्यातून रक्त वाहत होते. त्याला बोलताही येत नसल्याने त्या नागरिकांनी लागलीच जखमी अवस्थेत असलेल्या तरूणाला हंसीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले असता. तेथून डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज, अग्रोहा येथे रेफर केले. तेथून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी चक्क जीभेला 15 टाके घातले. त्यानंतर जखमी पतीने आपली व्यथा कागदावर लिहून मांडली. यानंतर बरवाला पोलिस स्थानकात सरस्वतीविरुध्द मारहाणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.