अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील कुंभार टेक भागातील रहिवाशी सौ ललिता चंद्रशेखर सोनार ह्या आपल्या कामाच्या ठिकाणी कोर्टासमोर श्रीगणेश पॅथॉलॉजि लॅब दि 25/5/2023 रोजी दुपारी 4 वा सुमारास नेहमीप्रमाणेच रणरणत्या कडक उन्हात कामास जात असतांना अमळनेर बस स्थानका समोर त्यांना 500 रुपयेच्या ९ नोटांचे पुंडके पडलेले सापडले. त्यांनी आजूबाजूस पाहीले असता त्या ठिकाणी कोणीच नाही दिसल्याने त्या आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन श्रीगणेश पॅथॉलॉजिचे मालक श्री सुनील पाटील यांना सदर सापडलेल्या पैशां बद्दल सांगीतले सुनील पाटील यांनी लागलीच अमळनेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना फोनवरून सापडलेल्या पैशां बद्दल कळविले व पैसे ज्या कुणाचे असतील त्यास परत करायचे असल्या बद्दल सांगीतले.
पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना मुळ मालकास शोधून काढून त्यास खाञी करून आपल्या समोर हजर करण्यास सांगीतले वरुन सदर ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता इस्लामपूरा भागातील टॅक्सी चालक कमरोद्दीन शेख अहमद वय 68 वर्ष यांचे महत्वाचे कामा असल्याने दुसर्या कडुन हात उसनवारी आणलेले पैसे खिशातून हातरूमाल काढत असतांना कुठे तरी पडले असल्या बाबत कमरोद्दीन यांनी सांगीतले तेव्हा तुम्ही घाबरु नका तुमचे पैसे सौ ललिता सोनार यांना सापडले असून पैसे तुम्हालाच परत मिळतील असे ऐकल्यावर कमरोद्दीन यांच्या डोळ्यात अश्रू आनावर झाले.
तेव्हा पोलीस ठाण्यात सौ ललिता सोनार यांना कमरोद्दीन यांनी गहीवरल्या मनाने व थरथरत्या हाताने अर्शिर्वाद तसेच बक्षीस म्हणून 1हजार रुपये देऊ केल्यावर सौ ललिता सोनार यांनी बक्षीस घेण्यास देखील प्रामाणिक पणे हात जोडून नकार दिला.सौ ललिता सोनार यांच्या आई देखील आजारी असुन डाॅ बहुगुणे यांच्या कडेस ऑडमिट असुन व पैशांची नितांत गरज असताना त्यांनी प्रामाणिक पणा दाखवला तेव्हा तेथील उपस्थित लोकांनी देखील ललिता सोनार यांचे प्रामाणिकतेला सलाम केला. सदर घटने वरुन लक्षात येते की आज संपूर्ण जग पैशांमागे धावत असताना आणि सख्खे भाऊही वैरी सारखे भांडत असताना देखील ह्याच समाजात आजही असे प्रामाणिक लोक आहेत.