जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२३
अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असताना एक धक्कादायक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे. एका संशयित आरोपीने कामाच्या निमित्ताने एका तरुणीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष देत तब्बल आठ महिने अत्याचार करून त्यानंतर लग्नास नकार देवून फरार होवून गेला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, एका २० वर्षीय तरुणीशी कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली व अमनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे वचन दिले व फेब्रुवारी २०२३ रोजी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर सातत्याने तो तिच्यावर अत्याचार करत होता. तिने लग्नाबाबत विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. या प्रकरणात अमन शिवकुमार शर्मा (२०, कृष्णानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची तरुणीने त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली.