जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२४
वरणगाव येथील तरुणाची मैत्रीपूर्ण संबंध असताना फोटो पाठवुन लग्न मोडल्याने वरणगांव येथील तरुणाविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तपत कठोरा येथील २३ वर्षीय तरुणीचे बी कॉम पर्यंत शिक्षण झाले असून तिचे वरणगावातील एका मित्रासोबत शिक्षण काळात मैत्री होती. सदर मुलीचे लग्न ठरले असल्याचे तिने सदर तरुणास सांगितले होते. तरी त्या वरणगांवच्या तरुणाने मुलीचा पाठलाग सुरूच ठेवला व मी तुझे लग्न दुसरीकडे होवु देणार नाही अशी धमकी दिली होती. दि १८ रविवार रोजी या मुलीचा साखरपुडा असताना सदर मुलीचे ज्या मुलाशी लग्न जोडले होते त्या भावी पतीला फोटो पाठवून सदर साखरपुडा मोडल्याचे या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादी वरून भंगाळे नामक तरुणाविरुद्ध वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी यांचे मार्गदर्शना खाली पोहे कॉ. मनोहर पाटील करीत आहे.