
जळगाव मिरर । २४ डिसेंबर २०२२

भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात ग्रामीण भागात मिळालेल्या यशानंतर आज शिरसोली येथील अनेक तरुणांनी आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते गळ्यात पक्षाचे मफलर टाकत पक्षात प्रवेश घेतला आहे.
जळगावात येथील ‘वसंतस्मृती’ भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात शिरसोली प्र न तालुक्यातील असंख्य तरुणांनी जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष युवामोर्चा श्रीकांत महाजन, ता. अध्यक्ष गोपाळ भांगाळे, भाऊसाहेब पाटील ता.अध्यक्ष युवा मोर्चा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी कुणाल अस्वार ,ज्ञानेश्वर कदम, पिरण पिंजारी ,अजय पवार, गौरव पवार, गणेश गायकवाड, मोहन ठाकरे, तौसिफ खाटीक यांच्यासह असंख्य तरुण उपस्थित होते. कुणाल अस्वार यांना युवा मोर्चा ता. उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर कदम यांना युवामोर्चा ता.चिटणीस, पिरण पिंजारी यांना युवा मोर्चा ता .अल्पसंख्याक चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल नियुक्तीपत्रे देण्यात आली व आ.राजुमामा भोळे यांनी भविष्यातील पक्षाच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अरुण सपकाळे ता.सरचिटणीस, संजय भोळे माजी ता.अध्यक्ष, ईश्वरभाऊ मराठे, ललित बरहाटे, ता. चिटणीस गिरीश वराडे आदी उपस्थित होते.




















