जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३ ।
अनेक परिवारात बहिण भाऊ असल्यावर कधी मस्करी तर कधी भांडण नित्याचे झाले आहे. अनेक भांडण हे वडिलापर्यत जात नाही तोच मिटून जात असते. पण अशी एक घटना घडली आहे. कि घटना एकून डॉक्टरांनी देखील डोक्याला हातच लावला आहे. एका भांडणात बहिणीने मोबाईल गिळला आहे. हि घटना मध्य प्रदेशातील भिंडमध्ये घडली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, मध्य प्रदेशातील भिंडमध्ये येथे भावाशी झालेल्या भांडणामध्ये एका १८ वर्षीय मुलीने मोबाईल गिळल्याचा प्रकार घडला आहे. या मुलीला तातडीने शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलं. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या पोटातून मोबाईलही बाहेर काढण्यात आला आहे.मुलीने मोबाईल फोन गिळताच तिला तीव्र वेदना होऊ लागल्या. तसंच तिचा अशक्तपणाही जाणवू लागला होता. त्यानंतर तिला शुक्रवारी ग्वाल्हेरच्या जैरोग्य रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यात आली. तपासणीनंतर ही घटना उघडकीस आली आणि घडलेल्या प्रकाराने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचंही डॉकटरांनी सांगितलं.
