जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२४
शहरातील फुले मार्केटसह गुजराल पेट्रोलपंपा मागील बाजूला असलेल्या निवृत्ती नगरातून चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेल्या. या दोन घटना शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी उघडकीस आल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात मुकेश गोकुळ जोशी हे वास्तव्यास असून ते पुजारी आहेत. दि. २३ रोजी सायंकाळी ते (एमएच १९, एवाय २७१७) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील फुले मार्केट परिसरात आले होते. त्यांनी दुचाकी मार्केटील मनपाच्या शौचालयाजवळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुकेश जोशी यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला. मात्र तरी देखील दुचाकी मिळून न आल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत शहरतील द्वारका नगरात धनंजय नवल पाटील हा तरुण वास्तव्यास असून त्याच्याकडे (एमएच ०५, डीएक्स ९०९६) क्रमांकाची दुचाकी आहे. त्याने दुचाकी गुजराज पेट्रोल पंपामागे असलेल्या निवृत्ती नगरात मोकळ्या जागेत लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी चोरुन नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर धनंजय पाटील याने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.