जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक कामगार कामासाठी नियमित येत असतांना दि.१० सप्टेंबर रोजी शहरातील शनिपेठ परिसरातील राजेंद्र रामचंद्र पाटील हे कंपनीतुन १५ हजार रुपये पगार घेवुन कस्तुरी हॉटेल पासुन ते काशीनाथ लॉज चौकापर्यंत एका ऑटो रीक्षात बसुन जात असतांना अॅटो रीक्षा मध्ये बसलेल्या तीन अनोळखीसह प्रवाशांनी त्यांच्या खिशातुन १५ हजार रुपये रोख रक्कम ही काढुन घेतली होती. याबाबत त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या वरुन गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे गोपणीय बातमीदार नेमूण घटनेदिवशी दुपारच्या वेळेस कोणती अॅटो रीक्षा सदर ठिकाणाहुन गेली होती व कोण कोण सदर अॅटो रीक्षा मध्ये बसुन होते याबाबत अवघ्या 12 तासांचे आत माहीती काढुन आरोपी नामे 1) अफजल बेग कमर बेग रा गेंदालाल मिल जळगाव, 2) सलमान खान सलीम खान रा.उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव यांना ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना दिनांक ११ सप्टेंबर रोजी रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता.
न्यायालयाने दिनांक १५ सप्टेंबर रोजी पावेतो पोलीस कस्टडी रीमांड दिली असता. सदर रीमांड दरम्यान आरोपीतांकडुन पुर्ण रक्कम व गुन्हयात वापरलेली अॅटो रीक्षा ही हस्तगत करण्यात आली आहे. सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, पोना. हेमंत जाधव, गणेश शिरसाळे, नाना तायडे, नितीन ठाकूर, योगेश बारी पोका. गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना. हेमंत जाधव हे करीत आहे.