जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४
अमळनेर विधानसभा निवडणुकीत नेहमीच निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा मराठा मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील यांनी यशस्वीपणे घेऊन दाखवत महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या तोंडावर धक्कातंत्र अवलंबत रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला नेत्या प्रदेश सरचिटणीस सौ.तिलोत्तमा पाटील यांनी कोणताही गाजावाजा ,जाहिरात न करता अवघ्या काही दिवसात युवा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मंगरूळ जानवे सारबेटा जिल्हा परिषद गटातील युवा कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.यानुसार गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांनी लावलेली उपस्थिती विरोधकांचे डोळे विस्फारणारी ठरली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. तिलोत्तमा पाटील यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात सत्ताधारी मंत्री व सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली. आपल्याला यंदा शरद पवार साहेब हेच आपले उमेदवार आहेत हे समजून कामाला लागावे लागेल कारण याच जिल्हा परिषद गटाने सर्वच विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णय भूमिका कायम बजावली आहे. यंदाही आपली जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहण्याची असून आपण भक्कमपणे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहावे असे आवाहन त्यांनी संवाद मिळाव्या प्रसंगी केले. कार्यक्रमात बोलताना सौ ताई यांनी आजी-माजी आमदारांच्या बोलण्याच्या वागणुकीच्या व एकूण कामकाज करण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत शेतकरी कष्टकरी कामगार विद्यार्थी युवक व महिला अशा सर्वच घटकांना एकजुटीने व एक मुखाने तू तरी फुंकण्याची विनंती केली.
माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना या मतदारसंघाने मला तीन वेळा फुकटात निवडून दिले त्यामुळे या जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत यंदाची लढाई ही निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची असल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचा मतदारसंघात विजय होईल यात काही शंका नाही असे म्हटले.
याप्रसंगी प्रदेशहून आलेले ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष छबू नागरे यांनी सबंध महाराष्ट्र शिंदे फडणवीस यांचे सरकार उलथून टाकायला सज्ज झालेला असून यात सर्वात भूमिका ही तरुणांची राहणार आहे त्यामुळेच युवा वर्गाने मोठ्या प्रमाणावर संघटित होऊन युवकांवरील झालेल्या रोजगारासारख्या प्रश्नांवरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची हिच योग्य वेळ असल्याचे मत मांडले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा अशोक पवार यांनी एकाही माजी मंत्राने आजपर्यंत पाडळसळे धरणासाठी शाश्वत काम केलेले नसून यांच्या कुठल्याही बोलतापांना बळी न पडता भक्कम बनाने महाविकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हा आम्हाला उभे राहण्याचे कार्य करावे लागेल आणि यासाठीच युवा वर्गाने पेटून उठले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मेळावा संयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस वेदांशु पाटील यांनी करतांना ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळून नेले जात आहेत त्याच पद्धतीने अमळनेरला मंजूर झालेले काही प्रकल्प पर जिल्ह्यात विकून टाकण्यात आल्याच्या माहितीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. इथून पुढे युवकांची नवीन एमआयडीसी हीच प्रमुख मागणी असायला हवी जेणेकरून तालुक्यात नवीन उद्योगधंदे उभारणीचे काम जोमाने होऊ शकेल आणि परिणामी सर्व सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम मिळेल आणि अशा प्रकारचे आश्वासन जो कोणी उमेदवार आपला देईल त्याच्यामागे आपली सर्वांची ताकद आपण उभी करू अशी युवकांना साद घातली.
युवा अध्यक्ष शिंदे यांनी अमळनेरचे एकेकाळचे औद्योगिक गतवैभव प्राप्त करून पुन्हा एकदा अमळनेरचे नाव आपणच महाविकास आघाडीच्या माध्यमातून उंचवू शकू असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते यशवंत बैसाणे यांनी उपस्थित यांना कुठल्याही जातीवादाला थारा न देता आपण केवळ आणि केवळ आपल्या जिल्हा परिषद गटातून तिलोत्तमा पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करण्याचे काम आज पासून जोमाने करावे लागेल कारण आदरणीय शरद पवार साहेबांनी जपलेला पुरोगामी विचारसरणीचा वारसा तालुक्यात जिवंत ठेवण्याचे काम ताईंच्या माध्यमातून जोपासली गेली आहे असे मत व्यक्त केले.
इच्छुक उमेदवार प्रशांत निकम यांनी देखील शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आपण पुढे नेत महाविकास आघाडीचा उमेदवार तालुक्यातून निवडून आणू असे म्हटले.
प्रसंगी युवा कार्यकर्ते विनोद सोनवणे,योजना पाटील, कल्याणी पाटील, कृष्णा पाटील, अनिल पाटील, मुकेश पाटील, दिनेश पाटील, प्रियल पाटील, दयाराम पाटील, भानुदास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास शिरूर जानवे लोंढे इंदा पिंपरी गाव पिंपरी पिंपळे मंगरूळ फेकू रणाईचे जवखेडा आंचलवाडी वाघोदे निसरडी खडके डांगर हेडावे रामेश्वर सारबेटे जूनोने रढावन राजोरे एकरुखी सुंदरपट्टी फाफोरे आदी गावातून युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उस्फुर्त उपस्थित होते.