जळगाव मिरर | १४ जुलै २०२४
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत नवीन शिक्षणिक वर्ष सुरू झाले असून या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ प्रशासनाने जणू काही विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट तयार केले आहे . विद्यापीठाच्या वसतिगृहात मोठ्या संख्येत विद्यार्थी व विद्यार्थिनी निवास करत असतात. सर्व विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही सामान्य आहे.
हे आसूनही विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ परिसरातील वसतिगृहाचे शुल्क हे ५० टक्यांनी वाढवले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ शाखेच्या निर्देशनास ही बाब आली आसून त्यांनी शुल्क कमी करण्याची मागणी दिनांक:- ६/०७/२०२४ रोजी माननीय कुलसचीवांना निवेदन देण्यात आहे होते. मात्र यावर कुठल्याही प्रतिक्रिया विद्यापीठ प्रशासनाने आजवर दिलेली नाही. या अनुषंगाने दिनांक:- १२ जुलै रोजी विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायदेशीर स्वरूपाने विद्यापीठात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून तसेच रावेर तालुक्यातील शेतकरी परिवारातील विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असून त्यांना सदर शुल्क भरण्यास शक्य नाही,असे प्रतिपादन प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे यांनी व्यक्त केले. तसेच शुल्क वाढीमुळे विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यास मोठे हाल होत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे असे प्रतिपादन जळगाव महानगरमंत्री सागर बरी यांनी व्यक्त केले. तसेच त्या ठिकाणी जिल्हा सहसंयोजक ऋषिकेश बारी व छगन पिसाळ, महनगरसहमंत्री स्नेहा मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.