जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२४
शहरातील विविध भागांतून गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी व शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत शहरातील गांधी मार्केट भागात दोन बहिणी एकत्र जात असताना, लहान बहीण मोठ्या बहिणीच्या मागे चालत होती. त्यानंतर काही वेळात मोठ्या बहिणेने छोट्या बहिणीला पाहिले असता ती आढळून आली नाही, फोन केला असता, फोन देखील बंद झाला होता.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या घटनेत एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या एका भागातून एकाच वेळी दोन अल्पवयीन मुलींना गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अज्ञातांनी फूस लावून पळवून नेले. एकाच भागातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.