कोणत्याही देशात राजकीय मंडळी भ्रष्टाचार तर करतातच. त्यासोबत नागरिक मूलभूत सुविधांपासून जर वंचित असेल तर साहजिक आहे, आपण सरकारला टॅक्सचे जे पैसे नागरींच्या सुविधांसाठी वापरलं जाणं अपेक्षित आहे त्या पैशांचा वापर ते स्वत:ची आर्थिक वृद्धी करण्यासाठी करतात. अशा नेत्यांना अनेकदा चपलांनी मारण्याची इच्छा तुम्हालाही झाली असेल. पण चपला फेकून आपलेच पैसे वाया जातील म्हणून लोक शांत बसतात. पण आता शांत बसण्याची गरज नाही. कारण एका व्यक्तीनं नेत्यांना चपला मारण्याचं मशीन तयार केलं आहे. या मशीनच्या मदतीने तुम्ही हव्या त्या नेत्याला वाट्टेल तितक्या चपला मारू शकता. अगदी तुमचा राग शांत होई पर्यंत. ऐकून थोडं विचित्र वाटतेय का? तर जरा दोन मिनिटं थांबा अन् हा व्हिडीओ पाहा, या व्यक्तीची सर्जनशिलता पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.
मंत्र्यांना चपला कशा मारायच्या?
आंदोलनात अनेकदा भ्रष्टाचारी नेत्यांच्या फोटोला चपलांचे हार घातले जातात. काही जण तर स्वत:ची पायताणं मंत्र्यांना मारून आपला राग व्यक्त करतात. पण आता जास्त लोड घेऊ नका. पाहा या आंदोलकानं कसला भारी जुगाड केलाय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्याने, एका कार्डबोर्डला भ्रष्टाचारी मंत्र्यांचे फोटो लावले आहेत. त्या बोर्डला दोन हँडल लावली आहेत. त्यापैकी एका हँडलवर तीन चपला लावल्या आहेत. दोरी खाली खेचली की हँडल वर जातं आणि चपला मंत्र्यांच्या तोंडावर लागतात.
The start up ecosystem in Pakistan has truly come of age. This #AutomaticLaanatMachine is the latest invention from the land of the pure. pic.twitter.com/qarqf3PsSA
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) August 18, 2022
व्हिडीओ पाहून नेटकरी झाले दंग
मंत्र्यांना चपला मारण्याची ही मशीन पाकिस्तानमधील एका आंदोलकाने तयार केली आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.