जळगाव मिरर । २० जानेवारी २०२३ ।
सिनेमाप्रेमीसाठी मोठी बातमी समोर आली आहे, ज्यातून सिनेमाप्रेमीचा आर्थिक खर्च एक दिवसासाठी कमी झालेला आहे. २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये पाहाता येणार आहे.
२० जानेवारी हा दिवस सिनेमा लव्हर्स डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने सिनेप्रेमींना चित्रपटगृहात फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहाता येणार आहे. गेल्या केही दिवसांपासून कोणताही सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. सिनेमा लव्हर्स डे निमित्त मल्टेप्लेक्स चेन म्हणजे सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपॉलिस लोकांना खास ऑफर देत आहेत. याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात कोणताही सिनेमा पाहण्यासाठी काही आटींचं पालन करावं लागणार आहे.
– प्रेक्षकांना फक्त २० जानेवारी रोजी फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे.
– ही ऑफर चंदीगड, पठाणकोट आणि पुदुच्चेरी याठिकाणी सिनेमा ९९ रुपयांमध्ये पाहता येणार नाही.
– 20 जानेवारी रोजी सर्व निवडक शहरांमध्ये सर्व शोसाठी ऑफर लागू करण्यात आली आहे.
– तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश याठिकाणी १०० रुपये आणि जीएसटी लागणार आहे.
– प्रिमियर कॅटेगरीसाठी ऑफर लागू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी चित्रपटगृहात ‘हे’ सिनेमे पाहाता येणार आहेत.