जळगाव मिरर | २८ जुलै २०२६
शालार्थ आयडी प्रकरणी नाशिकच्या एसआयटीने जळगावच्या संस्थाचालकास पकडले आहे. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड असे ताब्यात घेतलेल्या संस्था चालकाचे नाव आहे. या गुन्ह्यात सहावा संशयित पकडण्यात पथकास यश आले आहे.

विशेष तपास पथकाने गत आठवड्यात धुळे जिल्ह्यातून जळगाव येथील तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक केली होती. त्यांच्याकडील सखोल तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. संशयित हिंगोणेकर यांनी २८ ऑगस्ट २०११ ते ३ जून २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध शाळांमधील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्वाक्षरीच्या वैयक्तीक मान्यता प्रदान करीत त्याआधारे शालार्थ आयडी तयार केले. मात्र वैयक्तीक मान्यता व शालार्थ आदेश बनावट असल्याचे तपासात उघड झाले.
तसेच बनावट शालार्थ आयडी असलेल्या ८४१ पैकी ६३८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी फक्त जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचे आढळून आले. त्यानंतर एसआयटी प्रमुख सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके व त्यांच्या पथकाने सोमवारी दि.२७ रोजी परजिल्ह्यात कारवाई करीत जळगावमधील संस्थाचालक संजय गरुड यांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नाशिक विभागात शिक्षकांना बोगस मान्यता व शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आले होते त्या प्रकरणाची व्याप्ती विभागातील सर्व जिल्हयांमध्ये पसरली असली तरी सर्वाधिक बनावट मान्यता य जळगाव जिल्ह्यात देण्यात आल्या आहे. या पुर्वीच नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणान माजी शिक्षण उपसंचालकांना देखील अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असुन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी देखील रडारवन आले आहे. अनेक संस्थाचालक व मुख्यध्यापकांचे धाबे या प्रकरणाने दणाणले आहे. जिल्ह्यात बोगस मान्यतांचे कारनामे आता तपासाअंती उघड होण्याच चिन्हे आहेत.




















