
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६

येथील रामेश्वर कॉलनीत विचार वारसा फाउंडेशन आणि ३५८ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
विशाल देशमुख यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत ३५८ ग्रुपच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भास्कर सुरवाडे, संजय गवई,अक्षय गवई, श्रेयश सपकाळे, अमोल पनाड, अक्षय सुरवाडे, शुद्दोधन पनाड, प्रमोद निकम, गणेश निकम, प्रतिक साबळे, बंटी सुरवाडे, अमोल सुरवाडे, व माता रमाई महिला संघ पुनम निकम, उषा पनाड, ज्योती गवई, रेखा सुरवाडे, उज्वला पनाड, कांताबाई खरात, उषा सुरवाडे,कमल मोरे, विमल सपकाळे, दिव्या सुरवाडे, पुजा सुरवाडेआदी उपस्थित होते




















