जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या नियमित घटना घडत असतांना नुकतेच गुजरात – महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात साखरेने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आढळल्याने मोठा अपघात झाला आहे. घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटक गेला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. ट्रकमधील साखरेचा गोण्या देखील महामार्गावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजेच्या धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित झाला. अपघात झाल्याने लागलीच घटनास्थळी विसरवाडी पोलीस महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि या ठिकाणी मदत कार्य केले. ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपाययोजना करत आहे. घटनास्थळी 108 रुग्णवाहिकेला पोलिसांनी प्राचारण केले आहे. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील वाढते अपघात चिंतेच्या विषय बनला आहे.