जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
जगभरातील कानाकोपऱ्यात नवीन वर्षाचा मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. अमेरिकेतील न्यू ऑरिलीन्स येथे बुधवारी भीषण अपघात झाला असून एक ट्रक भरगर्दीत घुसला आणि अनेक लोक चिरडले गेले. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेत न्यू ऑरिलीन्स शहर फेमस बॉर्बन परिसरात ही घटना घडली. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत की हा नेमका हल्ला मनोरुग्णाने केला आहे की या मागे घातपात आहे याची चर्चा सुरु आहे.
स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या समाचार एजन्सी एसोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की ट्रक गर्दीत घुसला आणि ड्रायव्हरने बाहेर येऊन फायरींग केली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल फायरिंग केली. या हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर पाच स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती दिली गेली आहे असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. हा हल्ला बुधवारी सकाळी 3:15 वाजता बॉर्बन स्ट्रीटवर झाला. नव वर्षांच्या पूर्वसंध्येला होणारी ही पार्टी सर्वात मोठी समजली जाते. पोलिसांनी सांगितले की आरोपी हा अधिक लोकांना जखमी करण्याच्या इराद्याने हालचाली करीत होता. त्याने अधिकाधिक लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला.