• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2025
in क्राईम, राजकीय, राज्य, सामाजिक
0
दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२५

गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, मारोती कवडू मसराम (वय ६०, रा. जाटलापूर) असे मृत व्यक्‍तीचे नाव असून, पॅरालिसिसमुळे  मसराम यांना पळता न आल्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने त्यांना पायाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेने उचलून जमिनीवर आदळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज रविवारी सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हे दोन्ही हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. हत्तींनी त्यांच्याकडे धाव घेत एकाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेत उचलून आदळले. ही दुर्दैवी घटना पाहून शेतकरी हादरले.

घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी गावात धाव घेत ही माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. मसराम यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुलांचा परिवार आहे. घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केले आहे. हत्ती घटनास्थळावरून इतरत्र पळाले आहेत. वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत.

सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून, नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप आणि भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडून तत्काळ हत्ती नियंत्रणात घेण्याची आणि मानवहानी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group