जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
चार दिवसांपूर्वी चोरी झालेली दुचाकी घेवून फिरणाऱ्या दीपक दयाराम रुम (वय ३४), दीपक एकनाथ शेले (वय ३१, दोघे रा. रेणुकानगर) या चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेली दुचकी हस्तगत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरात राहणारे सहाजीद हबीब खाटीक (वय २४) यांची दुचाकी दि. ११ जानेवारी रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी दीपक रुम व दीपक शेले यांनी चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकॉ गणेश ठाकरे, अफजल बागवान व शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोकॉ अनिल कांबळे, पराग दुसाने यांनी भिलपुरा पोलिस चौकी भागातून ताब्यात घेत अटक केली. दोघांकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली.