जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२३
जळगाव एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे दि.७ रोजी एका तरुण चालकाला जबर मारहाण करण्यात आली होती. यात त्या चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मयत तरुणाच्या आईने एमआयडीसी पोलिसात धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. व काही लोकांवर संशय व्यक्त केला होता. एमआयडीसी पोलिसांनी याचा तपास केला असता दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून शहरातील एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे सागर रमेश पालवे (वय २४) हा चालक म्हणून काम करीत होता. दि. ७ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्टवर असतांना त्यास सदर ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणुन काम करणारे ज्ञानेश्वर उर्फ पिंटु बिजलाल बोदडे, वय ४० वर्षे, रा. अष्टमी कॉलनी मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर जि जळगाव, निलेश रोहिदास गुळवे, वय 22 वर्षे, रा. प्रियका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव अशांनी ट्रान्सपोर्ट आराम करण्याच्या रुममध्ये लाठया काठयांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्यास झालेल्या गंभीर दुखापती मुळे दिनांक ८ रोजी मयत झाला होता. म्हणुन सदर बाबतीत मयत सागर याची आई सौ.निलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल आरोपी बाबत माहिती काढुन ज्ञानेश्वर उर्फ पिंटु यास मुक्ताईनगर येथुन तसेच निलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथुन ताब्यात घेतले होते त्यांनी सदरचा गुन्हा कबुल करुन मयत सागर यास लाठ्या कांठयानी जबर मारहाण केल्या बाबत व त्यात तो मारहाण केल्यामुळे मयत झाल्या बाबत कबुल केले होते. त्यांना अटक करण्यात येउन आज रोजी न्यायमुर्ती श्रीमती जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि १२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे, पोउनि/दिपक जगदाळे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ / नितीन पाटील, किरण पाटील, सुधील साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी पोलीस चालक संदीप बि-हाडे अशानी आरोपीतास ताब्यात घेतले होते सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/निलेश गोसावी, पोकॉ/संदीप धनगर करीत आहे.