जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
चोपडा – अडावद रस्त्यावर दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत एक जखमी झाल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती. यात दुचाकीचे देखील नुकसान झाले होते. या प्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील रहिवासी ललित गणेश बारी (वय ४०) हे दुचाकी क्र.एम.एच.१९.ई.बी.६६३ ने दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेच्या सुमारास चोपडा – अडावद रस्त्यावरील माचला फाट्याजवळ जात असतांना मागून येवून त्यांच्या दुचाकीला संशयित आरोपी विश्वास पाटील(वय ४५) याची दुचाकी क्र.एम.एच.१९.सी.एम.६९१९ ने जबर धडक दिल्याने ललित बारी हे जखमी झाले आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नसीर तडवी हे करीत आहेत.